Enter your Email Address to subscribe to our newsletters
गेल्या काही आठवड्यांपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार का, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने १४ सप्टेंबर २०२६ रोजी एक महत्त्वाची अधिसूचना जारी करत स्थिती स्पष्ट केली आहे.
भारताच्या फिनटेक यशोगाथेचा युपीआय हा निर्विवाद विजेता आहे. असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ चे उद्घाटन करताना काल बोलत होते. यूपीआय आता ११ देशांमध्ये सुरू झाले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी एकेकाळी अकल्पनीय असलेली गोष्ट आता दैनंदिन वास्तव बनली आहे. भारताच्या प्रमुख डिजिटल पेमेंट प्रणालीच्या जागतिक विस्तारावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
आयकर विवरणपत्र हे केवळ कर भरण्याचे साधन नसून आपल्या आर्थिक शिस्तीचे, विश्वासार्हतेचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. वेळेवर आणि अचूक ITR दाखल केल्यास भविष्यातील आर्थिक नियोजन, कर्जप्रक्रिया, गुंतवणूक आणि करसंबंधित व्यवहार अधिक सुलभ होतात. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार करून आपले आयकर विवरणपत्र वेळेत दाखल करावे आणि जबाबदार करदात्याची भूमिका पार पाडावी.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील एक महान क्रांतीकारक संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी केवळ अध्यात्मच नाही, तर विज्ञान आणि अर्थशास्त्राची सांगड घालून समाजाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवला. तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी विदर्भात अमरावतीतल्या यावली इथे झाला.
उन्नती अल्पमुदत ठेव: संकटाच्या वेळी कुटुंबाचा भक्कम आधार!