स्वप्नपूर्तीसाठी “उद्यमवर्धिनी”, नव्या प्रवासाची सुरुवात
३० वर्षांपूर्वी सुजाता आणि हंबीरराव तीसगावहून कामानिमित्त शहरात काकांकडे आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यावर्षी घडलेल्या घटनेमुळे हंबीररावांचे जीवन बदलून गेले. गावांत मुसळधार पाऊस पडला. शेतातील उभे पीक वाहून गेले. शेताच्या बाजूने ओढा वाहत होता. यापूर्वी कधीही आले नाही इतके पाणी त्या ओढ्याला आले आणि हंबीररावांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यांचे वडील म्हणजे अण्णांनी बँकेकडून या शेतपिकासाठी कर्ज घेतले होते. सर्व उत्पन्न पाण्याखाली गेलेले पाहून अण्णांना धक्का बसला. बीपी वाढले आणि त्यातच त्यांना हृद्यविकाराचा झटका आला. थोड्याच दिवसांत उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
हंबीररावांना काय करावे काही सूचत नव्हते, त्यांचे वडील डोक्यावर कर्जाचा डोंगर ठेवून स्वर्गवासी झाले होते, घरात आई आणि दोन लहान मुली असा परिवार. काळाने घाला घातला आणि हंबीररावांच्या पायाखालची जमीन सरकली.
तेव्हा त्यांचे पुण्यातील काका मदतीला धावून आले, ते हंबीरराव आणि त्यांच्या पत्नीला शहरांत घेऊन आले. त्यांच्या ओळखीने एका ठिकाणी काम मिळवून दिले. सुजाता अतिशय चांगली सुगरण होती.तसेच तिला शिवणकामाची, विणकामाचीही आवड होती. काकूंनी तिला घरगुती मसाले बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुजाताला मसाले बनवण्याबद्दल माहिती होतीच पण व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण गरजेचे होते. काकूंनी गरजू महिलांसाठी काम करणाऱ्या मधुराताईंशी सुजाताची ओळख करुन दिली. सुजाताने रीतसर प्रशिक्षण घेतले. तिची कामातील मेहनत आणि चिकाटी पाहून मधुराताईंकडून तिला काम मिळू लागले. सुरुवातीला सुजाता एका मसाले बनवण्याच्या कंपनीत काम करु लागली. हंबीररावांचेही शिक्षण डिप्लोमापर्यंत झाले असल्याने त्यांनाही एका कंपनीत काम मिळाले. वर्षभर कामाचे नियोजन बसवून मुलींना आणि आईलाही शहरात आणण्यात आले.
सुजाताच्या संस्कारी स्वभावामुळे मुली चांगल्या शिकल्या आणि आपल्या पायावर उभ्या राहिल्या. हंबीररावांनी प्रकृतीच्या कारणास्तव व्हीआरएस घेतली. आता दोघेही सुजाताचा व्यवसाय सुरु करण्यासाठी काम करु लागले. जनता सहकारी बँकेच्या उद्यमवर्धिनी योजनेबद्दल सोशल मिडीयावरील जाहिरात सुजाताने पाहिली. सुजाताचे जनता बँकेमध्ये खाते होतेच. बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना भेटले. उद्यमवर्धिनी योजनेची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमची मालमत्ता तारण ठवून तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. तीन कोटींपर्यंत रक्कम तुम्हाला मिळू शकते. सिबील स्कोअरनुसार व्याजदर आकारला जाईल आणि त्वरित मंजुरी मिळेल. इतर सर्व माहिती अधिकाऱ्यांनी दिली आणि कर्जप्रक्रिया समजावून सांगितली.
"सृजन महिला उद्यम" या नावाने सुजाताच्या व्यवसायाला सुरुवात झाली. इतक्या वर्षांच्या कष्टाला जनता बँकेच्या मदतीने एक नवी वाट मिळाली.
सुरुवातीला त्यांनी घरच्या मोकळ्या खोलीतून "सृजन महिला उद्यम" नावाने छोटा उद्योग सुरू केला — खाद्यपदार्थ, मसाले, हस्तनिर्मित कापडी पिशव्या, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि पर्यावरणपूरक भेटवस्तू तयार करण्याचा.
पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या परिचयातील काही महिलांना बोलावले.
काही गृहिणी होत्या, काहींचं शिक्षण अपुरं होतं, तर काहींना कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कामाची आवश्यकता होती. सुरुवातीला तिला लोकांनी विचारलं “ताई, या वयात व्यवसाय सुरू करणार? जमेल का?”
पण सुजाताताईंनी हसून उत्तर दिले, “वय निवृत्तीचं झालं असलं, तरी स्वप्नांच्या भरारीला वय नसतं!”
काही महिन्यांतच त्यांचा व्यवसाय वाढू लागला.
ऑर्डर्स येऊ लागल्या, महिलांना नियमित काम मिळू लागलं.
आज “सृजन महिला उद्यम” हे नाव परिसरातील महिलांसाठी प्रेरणास्थान बनलं आहे. दहा महिलांनी सुरू केलेला हा छोटासा उपक्रम आज तीस महिलांना रोजगार देतो. सर्व महिला एकत्र काम करतात, एकमेकांना प्रोत्साहन देतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतात.
सुजाताताई म्हणतात — “निवृत्तीने माझं काम संपवलं नाही, तर नवी दिशा दिली. आता मी माझ्यासारख्या अनेक महिलांना आत्मनिर्भर बनवत आहे आणि हाच माझा खरा सन्मान आहे.”
स्वप्नं वयाचं बंधन मानत नाहीत; मनात इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक शेवट एक नवा आरंभ ठरतो.