| Date: |
आयकर कायदा कलम ३९३ अंतर्गत ठेवीवरील व्याजाची कर वर्षाची एकूण रक्कम कपातीसाठी बेसिक लिमिट ही वय वर्षे ६० पर्यंत साठी रु. ५०,०००/- चे आत आणि सिनिअर सिटीझन व्यक्तीकरिता करवर्षाची एकूण व्याजाची रक्कम रु. १००,०००/- चे आत असल्यास टी.डी.एस. कपात होणार नाही.
परंतु सदर कर वर्षातील ठेवी वरील व्याजाची रक्कम वर नमूद मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर आणि टी डी एस कपात करावयाचा नसेल तर फॉर्म क्रमांक १२१ भरून देणे अनिवार्य आहे. सदर फॉर्म मध्ये ओल्ड रीजीम अथवा न्यू रीजीम चा उल्लेख करणे आवश्यक आहे.
आयकर कायदा २०२५ मधील कलम ३९३(६) नुसार फॉर्म १२१ विहित नमुन्यातमध्ये सादर केल्यानंतर आणि फॉर्म सादर केल्याच्या तारखेनंतर व त्यातील अटींची पूर्तता झाल्यावर ठेवीदारांच्या व्याजावर टी.डी.एस कपात त्या महिन्यापासून होणार नाही.
परंतु फॉर्म १२१ मधील कोणत्याही अटीची पूर्तता होत नसेल तर नियमानुसार टीडीएस कपात केला जाईल. तसेच सदर टीडीएस कपात करताना सदर खातेदाराने पॅन सादर केलेला आहे आणि सदर पॅन ऑपरेटीव्ह असल्यास १० % दराने टीडीएस कपात केला जाईल आणि पॅन सादर केलेला नसल्यास / पॅन ईनऑपरेटीव्ह / इनव्हॅलिड असल्यास नियमानुसार २० % दराने टीडीएस कपात केला जाईल याची नोंद घ्यावी.
आयकर कायदा २०२५ च्या कलम ३९५ नुसार, करदात्यांना उत्पन्नावर कमी दराने टीडीएस (TDS) किंवा शून्य टक्के दराने टीडीएस (TDS) (Nil TDS) कापून घेण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. हे कलम जुन्या आयकर कायदा १९६१ मधील कलम १९७ चे अद्ययावत रूप आहे.
सदर सर्टीफिकेट खातेदार यांनी आयकर खात्याकडून दरवर्षी नव्याने घेणे आवश्यक आहे व आपल्या बँकेच्या TAN चा उल्लेख आवश्यक आहे. असे सर्टीफिकेटबँकेत सादर केल्यानंतरअशा ठेवीदारांचे ठेवी वरील व्याजावर सर्टीफिकेटवरील नमूद केलेल्या दराने टी.डी.एस कपात केला जाईल याची नोंद घ्यावी.
नवीन आयकर कायदा, २०२५ कलम २६२नुसार पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पॅन आणि आधार लिंक नसल्यास सदर पॅन इनऑपरेटीव्ह होईल व नियमानुसार २% ऐवजी २०% दराने TDS कपात होईल.
भारत सरकार कडून वेळोवेळी टीडीएस बाबत कोणताही बदल झाल्यास तो आपोआप लागू राहील. तसेच वर नमूदकेलेली माहिती ही संक्षिप्त स्वरुपात दिलेली असून पूर्ण माहिती घेणे साठी आयकर कायदा २०२५ चा आधार घ्यावाआणि कायद्यातील तरतुदी अंतिम राहतील.